गुरुवार, फ़ेब्रुवारी 22, 2018
   
Text Size

नाटके

गडकर्‍यांची नाटके हा आजही अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे. भावबंधन, एकच प्याला सारख्या नाटकांची तर आजही एव्हरग्रीन म्हणून जाहिरात केली जाते. वेड्याचा बाजार आणि राजसन्यास ही त्यांची नाटके मात्र अपूर्ण राहिली. गडकरी दीर्घायुषी झाले असते ती नाटके तर पूर्ण झालीच असती पण आणखी काही नव्या नाटकांचीही त्यात भर पडली असती. मराठीचे शेक्सपियर असा त्यांचा सार्थ उल्लेख होतो तो मुख्यत्वे नाटकांसाठीच. नुसती नाटकेच नाहीत तर त्यांची सुधाकर, सिंधू, तळीराम, घनश्याम, लतिका वगैरे पात्रेही अजरामर झाली आहेत. काळ बदलला, खरं तर गडकर्‍यांनी हाताळलेले दारूबंदीसारखे विषयही कालबाह्य झाले, पण गडकर्‍यांची नाटके सदाहरित राहिली याचे श्रेय त्या देवदुर्लभ अशा लेखणीलाच द्यायला हवे.

-------------------------------------------------------------------

कै. वि.सी. गुर्जर यांचे श्रेय..

गडकऱ्यांच्या नाटकांतील पदे गाजली आणि लाखो लोकांनी ती गुणगुणली. मात्र, गडकर्‍यांच्या "एकच प्याला" या नाटकाची पदे (आणि प्रस्तावना) त्यांचे जीवश्च कंठ्श्च मित्र आणि साहित्यिक कै. विठ्ठल सीताराम गुर्जर यांनी लिहीलेली आहेत हे आज अनेकांना माहीत नसेल. ह्या संकेतस्थळावर कै. वि.सी. गुर्जर यांच्या ह्या कर्तृत्वाची दखल घेतलेली खुद्द गडकऱ्यांनाही आवडली असती.

कै. गुर्जर यांचा परिचय शासनाच्या विश्वकोश संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्याचा दुवा खाली दिला आहेः 
http://www.marathivishwakosh.in/index.php?option=com_content&view=article&id=9333&Itemid=2

----------------------------------------------------------------------