गुरुवार, फ़ेब्रुवारी 22, 2018
   
Text Size

प्रेमसंन्यास अंक पाचवा (प्रवेश पहिला)

प्रवेश पहिला

(फाशीचा देखावा. सर्व मंडळी.)

जयंत
: जगावर शेवटची दृष्टी टाकताना आज त्यातली अपूर्व शोभाच दृष्टीस पडत आहे, लीले! पुन्हा हा देखावा मला कधीच पहायला मिळणार नाही ना?

लीला : अशीच त्या दीनदयाळू परमेश्वराची इच्छा दिसते; स्वर्गात तरी तो तुम्हाला सुखात ठेवो!

जयंत : लीले, स्वर्गाबद्दलची माझी कल्पना क्षणोक्षणी ढासळत चालली आहे. स्वर्गाची प्रत्यक्ष साक्ष अजून कोणाला पटली आहे का? त्यापेक्षा परिचयाने प्रिय झालेली ही पृथ्वी किती तरी हवीशी वाटत आहे. खरोखरीच स्वर्ग असेल का? परमेश्वर असेल का? ही देखता डोळ्या आड होणारी प्रेमाची सृष्टी पुन्हा कल्पनातीत काळी तरी लाभेल का? एक ना दोन, हजारो तर्कांनी आत्मा व्याकुळ झाला आहे; स्वर्गात अप्सरा असतील पण अशी बाळपणाची सोबतीण, संस्कारजन्य प्रेमाची खाण, अशी लीला असेल काय? स्वाभाविक रीतीने मरण येताना मनुष्य बेशुद्ध होतो हे त्याचे केवढे भाग्य! पण अगदी जाणीवपणाने जगाचा निरोप घेताना संशयाच्या भोव-यात सापडून माझी काय स्थिती झाली ही!

सुशीला
: बाळा जयंता, धीर धर, ही केवळ ईश्वरश्रद्धेची कसोटी आहे. दृढभावाचा भुकेला भगवान कोणालाही अंतर देत नाही. त्याच्यावर दृढविश्वास मात्र ठेव.

पुढे वाचा: प्रेमसंन्यास अंक पाचवा (प्रवेश पहिला)