गुरुवार, फ़ेब्रुवारी 22, 2018
   
Text Size

प्रेमसंन्यास अंक तिसरा (प्रवेश पहिला)

अंक तिसरा

प्रवेश पहिला


(दवाखान्यातील एक खोली. द्रुमन वळकटीवर बसली आहे. जवळ बाबासाहेब व शिपाई उभे आहेत. द्रुमनने तोंडावरून पदर घेतला आहे.)

बाबासाहेब : बाई, आता शेजारच्या खोलीतील रोग्यांनी अशी खबर दिली आहे की, पहाटेस तुमच्या खोलीत मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला! पुढे एक तशाच आवाजाची किंकाळी ऐकू आली आणि नंतर रडण्याचा आवाज बंद झाला! बाई, त्यामुळे दवाखान्याचा अधिकारी या नात्याने मजवर तुमच्या खोलीची झडती घेण्याचा वाईट प्रसंग आला आहे! (शिपायास) हं, पाहा रे नीट खोली तपासून. (शिपाई खोली तपासतात) बाई, तुम्ही कोण आहात? कुठल्या राहणा-या? का? बोलत नाही? आज चार दिवस मी यथे नव्हतो, त्यामुळे मला तुमची माहिती मिळाली नाही. नाही तर प्रत्येक रोग्याची मी स्वत: वास्तपूस करीत असतो!

शिपाई : बाई, जरा बिछान्यावरून उठा!
(द्रुमन एकदम वळकटीतून मृत बालक काढते.)

द्रुमन : देवा! अखेर हे केलेस ना! कशाला उठा? बाबासाहेब, हे पाहा माझे पाप आणि ही मी!

बाबासाहेब : कोण द्रुमन! राक्षसिणी, हे काय केलेस?

द्रुमन : कोण राक्षसी? मी कशाची राक्षसी? मी या बाळाची आई आहे.

पुढे वाचा: प्रेमसंन्यास अंक तिसरा (प्रवेश पहिला)