गुरुवार, फ़ेब्रुवारी 22, 2018
   
Text Size

प्रेमसंन्यास अंक दुसरा (प्रवेश पहिला)

अंक दुसरा

प्रवेश पहिला


(सुशीला निजली आहे; विद्याधर भीत भीत प्रवेश करतो.)

विद्याधर
: परमेश्वरा, या साहसात मला यश देऊ नकोस! माझ्या या साहसी हेतूला ही
वेळ आणि त्याचा विषय किती तरी प्रतिकूल आहेत. बाहेर शीतरश्मी
निशापतीने आपल्या अमृतवर्षी कोमल किरणांनी या भूतलावर चंद्रिकेचा
पाऊस पाडून अंतराळाला दुग्धवर्णाची शोभा आणिली आहे! या उरफाट्य
दुग्धसमुद्राचा नीलवर्ण तळाशी मंदतेजोमय तारकामौक्तिके विरल पसरली
आहेत! या पुण्यस्नानाने आनंदलेली भूदेवी मंदवायूच्या रूपाने वाहणा-या
समाधानाच्या निश्वासाबरोबर गगनमंडलात पुष्पराग उधळीत आहे.
पुण्यवंताच्या निकट सहवासाने पापवृत्तीसुद्धा पुष्कळशी मावळून जाते,
त्याप्रमाणे छायारूपाने वृक्षाखाली दडून बसलेल्या मूळच्या काळ्याकुट्ट
अंधाराला सुद्धा या चांदण्याच्या निकटवर्ती प्रभावाने किती तरी उजाळा आला
आहे! सजीव सृष्टीच्या शांतवृत्तीमुळे चंद्रिकेत हा सौम्य, शांत, स्पष्ट दृग्गोच्चार
होणारा शहराचा भाग पहात असताना, सृष्टीच्या सत्यतेचा विसर पडून,
दुर्बिणीतून एखाद्या चित्रातला देखावा मी पहात आहे असे वाटते! आणि
चंद्रिका म्हणजे रवितेजाचे चित्रात उतरलेले, मंद आणि दृष्टीसुसह रूपच नाही
तर काय? या देखाव्यात पुण्यशील सुशीला तर मूर्तिमंत शांतिदेवीच शोभते
आहे.

पुढे वाचा: प्रेमसंन्यास अंक दुसरा (प्रवेश पहिला)