गुरुवार, फ़ेब्रुवारी 22, 2018
   
Text Size

एकच प्याला अंक पाचवा ( प्रवेश पहिला )

प्रवेश पहिला

(फाशीचा देखावा. सर्व मंडळी.)

जयंत : जगावर शेवटची दृष्टी टाकताना आज त्यातली अपूर्व शोभाच दृष्टीस पडत आहे, लीले! पुन्हा हा देखावा मला कधीच पहायला मिळणार नाही ना?

लीला : अशीच त्या दीनदयाळू परमेश्वराची इच्छा दिसते; स्वर्गात तरी तो तुम्हाला सुखात ठेवो!

जयंत : लीले, स्वर्गाबद्दलची माझी कल्पना क्षणोक्षणी ढासळत चालली आहे. स्वर्गाची प्रत्यक्ष साक्ष अजून कोणाला पटली आहे का? त्यापेक्षा परिचयाने प्रिय झालेली ही पृथ्वी किती तरी हवीशी वाटत आहे. खरोखरीच स्वर्ग असेल का? परमेश्वर असेल का? ही देखता डोळ्या आड होणारी प्रेमाची सृष्टी पुन्हा कल्पनातीत काळी तरी लाभेल का? एक ना दोन, हजारो तर्कांनी आत्मा व्याकुळ झाला आहे; स्वर्गात अप्सरा असतील पण अशी बाळपणाची सोबतीण, संस्कारजन्य प्रेमाची खाण, अशी लीला असेल काय? स्वाभाविक रीतीने मरण येताना मनुष्य बेशुद्ध होतो हे त्याचे केवढे भाग्य! पण अगदी जाणीवपणाने जगाचा निरोप घेताना संशयाच्या भोव-यात सापडून माझी काय स्थिती झाली ही!

सुशीला
: बाळा जयंता, धीर धर, ही केवळ ईश्वरश्रद्धेची कसोटी आहे. दृढभावाचा भुकेला भगवान कोणालाही अंतर देत नाही. त्याच्यावर दृढविश्वास मात्र ठेव.

पुढे वाचा: प्रेमसंन्यास अंक पाचवा (प्रवेश पहिला)

 

अंक पाचवा
प्रवेश पहिला


(पात्रे- भगीरथ व शरद्; शरद् रडते आहे.)

भगीरथ : (स्वगत) भाईसाहेबांचं माझ्याशी असं तुटकपणाचं वागणं का होतं याचं कारण आता माझ्या लक्षात आलं! हा रोगातला रोग, मनाला मारणारा, जिवाला जाळणारा, हा मत्सर आहे! प्रेमाच्या स्पर्धेत निराश झालेल्या दीन जिवांचा हा निर्वाणीचा मत्सर आहे. कडू काळाचा कडवटपणाही याच्यापुढं अमृतासारखा वाटेल! या वयात, अशा अपत्यस्नेहाच्या भरात, भाईसाहेबांच्या विवेकशाली पुरुषालासुध्दा प्रेमानं- हे प्रेम नाही; निराशेत सात्त्वि प्रेम करुणावृत्तीचं रूप घेतं- या कामानं- कदाचित ज्याचं त्याला कळल्यावाचूनही असं होत असेल. या स्पर्धेची जाणीव रामलालांना पहिल्यापासूनच- नको हा विचार! भाईसाहेबांच्या नावाचा अगदी अनुदार उल्लेख झाला आणि विचार तर अगदी भलता झाला! अरेरे! परमेश्वरा, किती दु:खप्रद प्रसंगात मला आणून ठेवलंस हे! भाईसाहेबांच्या मनोवृत्तीविषयी न्यायनिष्ठुर निर्णय देण्यासाठी या हतभागी भगीरथानं विचार करावा? त्यांनी माझ्यावर केलेले उपकार आठवले म्हणजे माझ्या स्वत:चाही मला विसर पडायला हवा! दारूच्या नादानं जीवन्मृत झालेल्या भगीरथाला त्यांनी पुनर्जन्म दिला आणि त्यांच्या वर्तनाकडे त्या मीच अशा टीकादृष्टीनं पाहायचं? पित्याच्या पुण्यवृत्तीबद्दल संशय घ्यायचा, मातेच्या शुध्द शीलाबद्दल नीचपणानं चौकशी करायची, प्रत्यक्ष परमेश्वराच्या अस्तित्वाबद्दल तर्कवितर्क लढवायचे, तशातलंच हे अनन्वित पातक आहे! भाईसाहेबांनी आधीच आपल्या प्रेमाची रतिमात्र तरी कल्पना मला दिली असती तर शरद्च्या स्नेहभावाला प्रेमाच्या पायरीवर चढविण्याऐवजी मी केवळ परिचयाच्या उदासीन पदावर बसविलं असतं! पण त्यांनाच आधी त्यांच्या मनाची वृत्ती कळली नसेल! ते काही असो; माझ्या जीविताची वाटेल ती वाट लागली तरी भाईसाहेबांच्या सुखाच्या वाटेत मी कधीही आड येणार नाही. भगीरथप्रयत्नांनी शरद्च्या प्रेमाचा वेग भाईसाहेबांकडे वळविलाच पाहिजे. (उघड) शरद्, अशा हृदयभेदक स्थितीतही तुझ्याशी निष्ठुरपणानं  बोलतो याची मला क्षमा कर. आता तुझ्याशी असं बोलताना मला समाधान वाटत आहे असे मुळीच समजू नकोस. या विषारी विचारानं माझं हृदय आतल्या आत सारखं जळत आहे. अगदी उपाय नाही म्हणूनच मला  असं बोलावं लागत आहे, त्याची क्षमा कर आणि माझ्या प्रश्नाचे उत्तर दे. शरद्, भगीरथाच्या सुखासाठी वाटेल ते दु:ख भोगायला तू तयार आहेस का? हं, अशी रडून मला निरुत्साह करू नकोस! संशयाच्या दीन दृष्टीनं पाहू नकोस! अशा प्रश्नाचं स्पष्ट शब्दांनी उत्तर देणं कोणत्याही बालिकेला, त्यातून तुझ्यासारख्या कोमल मनाच्या आणि आजन्म दु:खाग्नीत करपून निघणार्‍या बालविधवेला अगदीच मरणाहूनही अधिक आहे, हे मी जाणून आहे! पण आताचा प्रसंगच असा चमत्कारिक आहे, की स्पष्ट बोलल्यावाचून गत्यंतर नाही. कुलीनतेची मर्यादा आणि प्रायोजकता यांनाही आपण क्षणभर बाजूला ठेवलं पाहिजे. सांग शरद्, अगदी मोकळया मनानं सांग. भगीरथाच्या सुखासाठी तू वाटेल ते दु:ख भोगायला तयार होशील का?

शरद् : तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचं कारणच नाही. जे तुमचं सुख ते माझं दु:ख असं कधी तरी घडेल का?

भगीरथ : प्रेमाच्या सहवासात राहताना भिन्न जिवांना जी एकरूपता मिळते तीच विरहाच्या चिरनिराश सृष्टीतही राखणे फार दुष्कर आहे.

शरद् : विरहाची सृष्टी! विरहाची कल्पना आपण आता-

भगीरथ : मनाचा धडा करून एकदाच, एकदम स्पष्टपणं काय ते बोलून टाकतो. शरद्, दुसर्‍या कशासाठी जरी नाही, तरी केवळ या भगीरथाच्या सुखासाठी- शरद्, क्षमा कर, हात जोडून हजार वेळा तुझी क्षमा मागतो- पण तुला भाईसाहेबांची विनंती मान्य करावी लागेल! रामलालशीच तुला पुनर्विवाह करावा लागेल!

शरद् : भगीरथ, भगीरथ, काय हो बोललात हे? खरोखरीच तुमचं हृदय पार जळून गेलं आहे का? अगदी विषाचा- भगीरथ, हृदयदाहक प्राणघातक विषाचा- वर्षाव केलात हो माझ्यावर!

पुढे वाचा: एकच प्याला अंक पाचवा (प्रवेश पहिला)