गुरुवार, जानेवारी 18, 2018
   
Text Size

एकच प्याला अंक पहिला ( प्रवेश पाचवा )

प्रवेश पाचवा

(स्थळ : सुधाकराचे घर. पात्रे: सुधाकर व तळीराम.)

सुधाकर : (स्वगत) चोवीस तास झाले, मस्तकावर नुसते घणाचे घाव बसताहेत! काही सुचत नाही, काही नाही.

(राग- तिलंग; ताल-आडा-चौताल. चाल- रघुबिरके चरन.)
जड बधिर हृदय शिर, भयकर मतिसंकर।
तनुदहनहि खर॥ ध्रु.॥
नारकहुताशन। दाह का घोर।
जळी वा प्रलयकर-। रविकिरणनिकर॥ 1॥
(मेजावर डोके ठेवून पडतो.)

तळीराम : (येऊन) दादासाहेब!

सुधाकर : तळीराम, मला काही सुचेनासं झालं आहे.

तळीराम : दादासाहेब, अशा आपत्ती या संसारात यायच्याच!

सुधाकर : तळीराम, अशा आपत्तींची मी पर्वा करतो असं का तुला वाटतं! मला ही अपमानाची आपत्ती सहन होत नाही! हलकटांनी हेटाळणी करावी, लब्धप्रतिष्ठितांनी छी: थू करावी, आपल्या वै-यांनी समाधानानं हसावं! तळीराम, माँ कुबेराची संपत्ती लाथेनं झुगारून दिली असती, आणखी पुन्हा हातानं ओढून आणली असती! पण या अपमानाच्या जाचण्या सहन होत नाहीत.

तळीराम : उद्या चार दिवसांनी या गोष्टीचा विसर पडून-

सुधाकर : विसर? ती गोष्टच विसर! प्राण जाईपर्यंत या सर्पदंशाच्या वेदना चालू राहाणार! नाही रे ... नुसती आग भडकून तळमळ चालली आहे! आत्महत्या ही नामर्दपणाची गोष्ट म्हणून म्हणतात... शिवाय आत्महत्येनं मी देहरूपानं सिंधूला अंतरेन ... तिच्या त्या दु:खाची कल्पना तर ... तळीराम शरीराचा नाश केल्यावाचून मरणाची जोड देणारं एखादं विष नाही का?

तळीराम : असं विष नाही, पण असं एक अमृत मात्र आहे! दादासाहेब, मी तेवढयासाठीच आलो आहे. तुम्ही चारचौघांच्या समजुती उराशी धरून बसणारे नाही आहात- स्वतंत्र बाण्याचे आहात! नुसत्या बोभाटयानं तुम्ही भिणार नाही, म्हणून तुमच्याशी बोलण्याचा मी धीर करतो. या तुमच्या दु:खाचा थोडा तरी विसर पडावा अशी तुमची इच्छा असेल तर त्याला इलाज आहे! तुम्ही रागावणार नाही? सांगू मी तो इलाज?

पुढे वाचा: एकच प्याला अंक पहिला (प्रवेश पाचवा)