गुरुवार, फ़ेब्रुवारी 22, 2018
   
Text Size

भावबंधन अंक पाचवा (प्रवेश पहिला)

प्रवेश पहिला

(स्थळ : धनेश्वराचे घर; पात्रे : इंदु व बिंदु.)

बिंदु
:    अगं, तो म्हातारा शास्त्री, गेला कुठे काळेच करून गेला म्हणे ! त्याने आणाशपथा वाहिल्या होत्या ना चांगल्या ! पुरुष हे असेच !

इंदु
:    अगं, तो तसाच लबाड होता. आणि दिसायचा तरी किती वाईट, नाही ? काय त्याचे ते रूप !

बिंदु :    अगं रूपाचे राहू देत. नसते एखाद्याला चांगले रूप ! तुझे कुठे रूप अगदी वाया चालले आहे ?

इंदु :    अन् तू अगदी पद्मीणीसारखी असशील? साती अप्सरा ओवाळून टाकाव्या तुझ्यावरून ! दुसर्‍याचे बरे बघवत नाही तर आपले डोळे फोडून घ्यावेत; लोकांना का नावे ठेवावी ? (महेश्वर-आंधळा प्रवेश करतो.)

बिंदु
:    तूच घे आपले डोळे फोडून ! जोडी तरी चांगली शोभून दिसेल त्या आंधळया गवयाची आणि तुझी ! तो बघ, आलाच.

इंदु
:    (महेश्वरास) अहो कामण्णा, तुम्ही असे एकटे का हिंडता?

बिंदु
:    कुणाला सांगावे रस्ता दाखवायला ?

महेश्वर :    (स्वगत) गाठले या काळया पोरींनी ! बाकी लतिकेचा आधार असल्यावर आता या देवींची पत्राज ठेवायला नको. (उघड) तुम्ही आहातच ना दोघी ?

बिंदु :    (स्वगत) आज यांना अखेरचे विचारते; नाही तर टाकते सांगून सगळयांना यांचे चरित्र ! (उघड) तुमच्या वचनाची तुम्हाला आठवण आहे ना ?

इंदु :    बिंदूताई, लागलीस चोबडेपणा करायला ! नका बोलू हो तुम्ही तिच्याशी.

महेश्वर :    तुझी आज्ञा मला मान्य आहे.

बिंदु :    तिच्याशीच नका बोलू तुम्ही.

पुढे वाचा: भावबंधन अंक पाचवा (प्रवेश पहिला)