गुरुवार, फ़ेब्रुवारी 22, 2018
   
Text Size

पुण्यप्रभाव अंक सहावा (प्रवेश पहिला)

प्रवेश पहिला

(नूपुर प्रवेश करतो.)
नूपुर : (स्वगत) जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही म्हणतात ते काही खोटे नाही! या बाईच्या बाबतीचा मोह काही सुटत नाही! एवढया रात्री ही बाई एकटी या स्मशानात का जात आहे? काहीतरी कुलंगडे आहे खास! बाईबरोबर बारदानही बरेच दिसले! मग का जडजोखीम आहे, की उताराधुतारा आहे, की मेलेले मूलबीलच आहे? मोठी चुटपुट लागली आहे मनाला! काळोख पण कसा मी म्हणतो आहे; म्हणून एकटयाला जायची छाती होत नाही! त्यातून आज अमावास्या म्हणजे भुताखेतांची पुरी चांदरात! आज सारी भुतावळ उजळमाथ्याने मिरवायला निघायची! (राजा येतो.) अरे बापरे, हे कोण?  का नाव घेतल्याबरोबर भूत दत्त म्हणून पुढे उभे? बाकी मी दत्त म्हणून उभा राहिलो तर ते नाहीसेही होईल! तूर्त दबा धरून बसावे हेच उत्तम!

राजा : (स्वगत) भूपालासारख्या अगदी निकटच्या आप्तानेच दगलबाजी केल्या दिवसापासून मनाची जी चलबिचल उडाली आहे, तिच्यामुळे अशा रीतीने वेषांतर करून लोकांत रात्री अपरात्री वावरण्याचा हा नवीनच हृद्रोग मला जडू पहात आहे.

नूपुर : (स्वगत) हा, आता आठवली युक्ति! (उघड) अहो, रामराम!

राजा
: (चपापून स्वगत) हा एवढया रात्री असा अनोळखी रामराम कुणाचा?

नूपुर : (स्वगत) बापरे, हा तर खांबासारखा निश्चल उभा आहे! आता मलाच राम म्हणावा लागतो की काय? (उघड) अहो, रामराम म्हटले ना?

राजा : (स्वगत) हा खरा जुलमाचा रामराम. (उघड) रामराम!

नूपुर : (स्वगत) भूत खास नाही. (उघड) कोण आहे ते?

पुढे वाचा: पुण्यप्रभाव अंक सहावा (प्रवेश पहिला)