गुरुवार, फ़ेब्रुवारी 22, 2018
   
Text Size

पुण्यप्रभाव अंक तिसरा (प्रवेश पहिला)

प्रवेश पहिला

(स्थळ: तळघर. भूपाल प्रविष्ट.)
भूपाल : (स्वगत) काय भयंकर काळोख हा !
(मग जैयां हो.)
प्रलयाची जी हतदशा । आली ती का आता ॥ध्रु.॥
रविकिरणां वाटे भय याया । बघुनियां ऐशा या एकान्ता ॥1॥
या तळघराच्या कैदखान्यात शरीराला त्यात मर्यादिलेल्या जीवात्म्याप्रमाणेच कोंडल्यासारखें वाटत आहे. किती भेसूर स्तब्धता ही! उबलेल्या पाकोळयांनी वार्‍याच्या चुकून आलेल्या झुळकीचा गारवा लागताच पंख फडफडविले म्हणजे माझ्या स्वगत विचारांच्या हालचालीनेसुध्दा रागावलेली स्तब्धताच मला गप्प राहायला सांगत आहेशी वाटते. कोपर्‍याकोपर्‍यात कादटलेला काळोख जणू काय एवढयाशा जागेत कसाबसा सामावण्याचा प्रयत्न करीत आहे. या झरोक्याच्या फटीतून दिसणारी एकच तारका काय ती तेजाची साक्ष देत आहे. खरे म्हटले तर, जीवकोटीच्या हिशेबात एक जीवाच्या वाटयाला एक तारा थोडी झाली का! पण तीसुध्दा डोळे चिमकावून माझ्या अगतिक स्थितीचा उपहास करीत आहे! तेजस्वी बाले, चार भिंतींच्या कोंडवाडयाबाहेर मला जाता येत नाही म्हणून का मला हसत आहेस ? वेडे, अवाढव्य आकाशाच्या मैदानातही तुला तरी आखलेल्या रेषामात्र मार्गापासून जरासे इकडे तिकडे सरकता येते आहे का! मग हसायचे कारण कुठे उरले! टीचभर जागेत काबलेला भूपाल काय आणि अनंत अंतराळात खिळलेली तारका काय-पूर्वसंचिताने दोघांनाही सारखेच जखडून ठेविलेले आहे !

पुढे वाचा: पुण्यप्रभाव अंक तिसरा (प्रवेश पहिला)