गुरुवार, फ़ेब्रुवारी 22, 2018
   
Text Size

हूरहूर


काळोखामधुनी पल्याड न दिसे या रात्रींचा शेवट,
आणि मोहकता तिला तरि कसा दुष्प्राप्य तारागण?
अज्ञेयांतुनि आरपार न दिसे दिक्काल यांचा तट,
चित्ताच्या नयनीं दुरुन खुपती कां दिव्य आशाकण?
मी श्वासास धनी, अखंड फिरतो वारा भरारा जरी,
आधीं बारिक वाडगें तरि तया हीं कुंपणें घातली !
या वार्यावर बांधणार कवि मी उंची मनोरे परी?
केव्हां नांगरणार ताल उघडी ही माळरानांतली?
जें दृष्टीस दिसे न, तेंच पटुनी वाटेल चित्ता कधी ?
बुध्दीला जिरवीन भावजलिं का? - आशा न मातें दुजी
तेजाला हुडकीन कां लपलिया या अंधकारामधी?
केव्हां मस्तक लोपुनी हृदयि या होईल उंची खुजी ?
माझें होइल सर्व हें कधिं, मला जें आजला पारखें?
माझें चित्रच नाचवीन नयनीं माझ्या कधीं सारखे ?