मंगळवार, डिसेंबर 12, 2017
   
Text Size

जुंन्या कवितांची आठवण


सार्या त्या कविता तशाच असती; ते अर्थही त्यापरी ।
शाळाही अजुनी नवीच दिसते त्या रम्य जागेवरी ॥
**! वाहतसे भरुनि दुथडी 'उल्हास1' तेव्हां जशी ।
गेला वाहुनि काळ तो, सकळ ती सौख्येंहि त्यांची तशी ॥1॥

1. ही नदी बोरघाटांत खंडाळयाच्या तळयांत उगम पावून कर्जत नेरळहून वाहत जाऊन कल्याणच्या खाडीस मिळते.
आनंदे भरलें असें जग तसें आतांहि**!पहा ।
**ही असतील त्यापरि किती लोकांत रम्य अहा ॥
प्रेमाची नवजीवनेंहि दिसती स्वच्छंद चोहींकडे ।
ज्याचें त्यास नसे तरे जगभरी शून्यत्व ये रोकडे ॥2॥

बाले, दृष्टि मनोहरा मजवरी तू टांकिली ज्या क्षणी ।
गेला तो क्षण सांग सांप्रत कुठे ? हे शक्य राही मनीं ॥
काळाच्या उदरांत खोल दडला जाऊनि कोठे तरी ।
**! शोकच शेष आज उरला प्रेमांतुनी अंतरी ॥3॥

विद्यादानि नसे विशेष गति या बाल्यांत आम्हां तशी ।
प्रेमाच्या पहिला धडा गिरविला निर्दोषशा मानसी ॥
**! ती वचने मरुन पडली ; पद्यांत त्यां पाठवी ।
''गोविंदाग्रज'' आज विव्हल मनें, **! तुला आठवी ॥4 ॥

-    13.2.1918, बोरिवली,