मंगळवार, डिसेंबर 12, 2017
   
Text Size

अन्य साहित्य

नाटके, काव्य आणि विनोदी लेखन ह्या तीन मुख्य प्रकारांच्या बाहेर वर्गीकरण करावे लागेल असे लेखन अन्य साहित्य ह्या विभागात समाविष्ट केले आहे. चिमुकली इसापनिती हे गडकर्‍यांचे सर्वांत छोटे म्हणजे जेमतेम १० पानांचे पुस्तक बालकांसाठी आहे. त्यात मुलांसाठी इसापनितीतल्या गोष्टी गडकर्‍यांनी लिहील्या आहेत. त्या गोष्टींचं वैशिष्ट्य म्हणजे गडकर्‍यांनी जाणीवपूर्वक एकही जोडाक्षर आपल्या ह्या लिखाणात येऊ दिलेलं नाही. गडकर्‍यांनी काही स्फुट लेख लिहीलेले आहेत. ते ह्या विभागात समाविष्ट केले आहेत. गडकर्‍यांनी आपले गुरू श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांना लिहीलेले पत्रही आपल्याला ह्या विभागात वाचायला मिळेल.