गुरुवार, फ़ेब्रुवारी 22, 2018
   
Text Size

काव्य

वाग्वैजयंती हा गडकर्‍यांचा एकमेव काव्यसंग्रह. त्यातील कवितांचे वैविध्य लक्ष वेधून घेणारे आहे. मुक्तछंदापासून ते छंदबद्ध कवितेपर्यंत, आणि चार ओळींच्या कवितेपासून ते दहा पाने भरतील एवढ्या दीर्घकवितांपर्यंत अनेक प्रकार त्यांनी त्यात हाताळले आहेत. कवितांची पार्श्वभूमी एखाद दुसर्‍या परिच्छेदात सांगून नंतर कविता पेश करण्याची त्यांची पद्धत कवितेला वाचकाच्या मनात अधिक खोलवर नेते. आपलं लहान बालक मृत्यूशय्येवर असतानाची मातेची मनःस्थिती 'राजहंस माझा निजला' ह्या कवितेत गडकर्‍यांनी मांडलेली आहे. त्या कवितेच्या प्रस्तावनेचा तो परिच्छेद वाचला की कवितेत शिरण्याची एक विशिष्ट मनःस्थिती तयार होते. कवितेसाठी गोविंदाग्रज हे टोपण नाव गडकर्‍यांनी घेतले.