गुरुवार, जानेवारी 18, 2018
   
Text Size

एकच प्याला अंक पहिला (प्रवेश पहिला)

अंक पहिला

प्रवेश पहिला

(स्थळ: सुधाकराचे घर. पात्रे: सुधाकर दूरध्वनिका (टेलिफोन) यंत्राजवळ बसला आहे.)

सुधाकर : कोण तीनतीनदा घंटा देत आहे? कोण? (ऐकून) हो, मी सुधाकर आहे! सुधाकर! पण बोलतं आहे कोण? रामलाल! (पुन्हा ऐकून) हो. तिच्याकडून सर्व तयारी आहे. तू लवकरच चल. सिंधू, जरा इकडे ये पाहू! सिंधू!

सिंधू : हे काय भलतंच? आपलं नावानंच हाक मारीत सुटायचं?

सुधाकर : तर काय तुझं नाव टाकू? मग तूच उलटी माझ्या नावानं हाका मारीत सुटशील! हे पाहा, भाईसाहेबांनी आता विचारलं आहे त्याच्या निघण्याची सर्व तयारी आहे का म्हणून? तो येईलच इतक्यात.

सिंधू : तयारी सर्व आहे; पण भाई जाणार म्हणून कुठल्या कामाला उत्साह कसा तो वाटत नाही.

(राग: यमन; ताल: त्रिवट. चाल : येरी आली पिया बिन.)
लागे हृदयी हुरहुर। अजि।
सुखविषय गमति नच मज सुखकर॥ ध्रु.॥
काही सुचेना। काही रुचेना।
राही कुठे स्थिर मति नच पळभर॥ 1॥

सुधाकर : वृष्टीपूर्वीची अभ्रे जमू लागली का? सिंधू, असं म्हणून कसं चालेल? ज्या जगात आपण आलो आहो, ते इतके चमत्कारिक आहे की, त्यातल्या नुसत्या चांगल्या गोष्टीचीच अपेक्षा करायला निरंतर नुसत्या दु:खात दिवस काढावे लागतील!

(राग: छायानट; ताल: त्रिवट. चाल: नाचत धी धी.)
सुखचि सदा कधि मिळत न कवणा। मिश्ररूप जग।
सुखचि रिघे अघ। दु:खातुनि हो जन्म सुखांना॥ ध्रु॥
हो जरि आशा मात्र सुखवशा। करित विधि तरी अंति निराशा॥
रमत मतिही नच प्राप्त सुखीही मग । करि अवमाना॥ 1॥

केव्हाही उत्साह सोडून चालायचं नाही. शिवाय रामलालभाई जातो आहे तो केवढया महत्त्वाच्या कामासाठी! या प्रसंगी आपण त्याला आपल्या निरुत्साहानं असं तद्रूप करायचं! वा:, आपण तर उलट त्याचा उत्साह द्विगुणित केला पाहिजे.

पुढे वाचा: एकच प्याला अंक पहिला (प्रवेश पहिला)