गुरुवार, जानेवारी 18, 2018
   
Text Size

राजसंन्यास अंक पहिला

अंक पहिला
प्रवेश पहिला


पाच देवींचा पाळणा
गुणि बाळ असा जागसि का रे वाया।
नीज रे नीज शिवराया॥ ध्रु.॥
अपरात्रीचा प्रहर लोटला बाई।

तरि डोळा लागत नाही॥
हा चालतसे चाळा एकच असला।
तिळ उसंत नाही जिवाला॥
निजवायाचा हरला सर्व उपाय।
जागाच तरी शिवराय।
चालेल जागता चटका।
हा असाच घटका घटका।
कुरवाळा किंवा हटका।
का कष्टविशी तुझी सावळी काया।
नीज रे नीज शिवराया॥ 1॥

ही शांत निजे बारा मावळ थेट।
शिवनेरी जुन्नरपेठ॥
त्या निजल्या ना तशाच घाटाखाली।
कोकणच्या चवदा ताली॥
ये भिववाया बागुल तो बघ बाळा।
किती बाई काळा काळा॥
इकडे तो सिध्दी-जमान
तो तिकडे अफजलखान।
पलीकडे मुलुखमैदान।
हे आले रे तुजला बाळ धराया।
नीज रे नीज शिवराया॥ 2॥

पुढे वाचा: राजसंन्यास अंक पहिला