गुरुवार, फ़ेब्रुवारी 22, 2018
   
Text Size

प्रेमसंन्यास अंक पहिला (प्रवेश पहिला)

अंक पहिला

प्रवेश पहिला

(बाबासाहेब, तात्यासाहेब व कमलाकर आगगाडीची वाट पहात आहेत.)
बाबा : तीन घंटा तर झाल्या ! ही तिसरीच घंटा ना? पण गाडीचा अजून पत्ता नाही.
तात्या, गाडीची वेळ तर बदलली नाही ना?

तात्या : छे, छे, वेळ बदलली असेल तर घंटा कशाला होतील? हिंदू लोकांच्या
गचाळपणाला हसता हसता साहेब लोकांनीही अखेर तोच मार्ग पत्करला
आहेसे दिसते. कमलाकर, तपास करा बरे काय झाले आहे त्याचा.

कमलाकर : इथून विचारून जमायचे नाही. तात्यासाहेब, आपण आणि बाबासाहेब इथेच
थांबा काही काळ. मी त्या बाजूला जाऊन तपास करतो.
(जातो.)

बाबा : तात्या, तुझ्याशी मघापासून बोलेन बोलेन म्हणतो, पण अजून धीर होत
नाही; माझे बोलणे ऐकून तुला कदाचित विषाद वाटेल.

तात्या : विषाद! मला आपल्या बोलण्याचा विषाद कधीच वाटत नाही. बाबासाहेब,
आपल्यातल्या सामाजिक मतभेदामुळे आपल्या दोघांच्या विचारात इतके
अंतर पडत गेले, पण म्हणून आपल्या बालपणाच्या बंधुभावात अंतर पडले
आहे का? काय सांगावयाचे असेल ते मोकळ्या मनाने सांगा.

पुढे वाचा: प्रेमसंन्यास अंक पहिला (प्रवेश पहिला)