गुरुवार, फ़ेब्रुवारी 22, 2018
   
Text Size

विनोदी लेखन

गडकर्‍यांचे विनोदी लेखन त्यांच्या संपूर्ण बाळकराम ह्या पुस्तकात एकत्रितपणे मिळते. नाट्यछटेपासून ते संवाद आणि विडंबनापर्यंत विविध प्रकारांतून गडकर्‍यांनी विनोद हाताळलेला दिसतो. त्याचे वर्णन करण्यापेक्षा तो विनोद वाचावा आणि आजच्या आधुनिक काळातही खदखदून हसावे असा मोह होणं स्वाभाविक आहे. संपूर्ण बाळकरामचे पान न पान खरोखरीच उच्च अभिरूचीच्या हास्यरसाची निर्मिती करणारे आहे.

राम गणेश गडक-यांनी 'मासिक मनोरंजन'मध्ये
'बाळकराम' ह्या टोपण नावाने विपुल लेखन केले.
पुढे ह्यातील काही लेखांचा संग्रह 'रिकामपणची कामगिरी'
ह्या नावाने पुस्तकरुपाने प्रसिद्ध झाला.
'रिकामपणची कामगिरीसह' 'संपूर्ण बाळकराम'
येथे अंतर्भूत केला आहे.