गुरुवार, फ़ेब्रुवारी 22, 2018
   
Text Size

राम गणेश गडकरी समग्र साहित्याचे संकेतस्थळ

राम गणेश गडकरी हे नाव नुसते उच्चारले तरी मराठी वाचकाला ‘गडकरी’नावाचे जग समोर दिसू लागते. आजच्या आधुनिक युगातला एखादा शाळकरी विद्यार्थीही ‘एकच प्याला’,’भावबंधन’सारख्या नाटकांची नावे सहजपणे सांगून जातो. गडकरी गेले त्याला आता ८५ वर्षे उलटून गेली. साधारण:२५ वर्षांची एक पिढी असा हिशोब धरला तर गडक-यांच्या मृत्यूनंतर तीन पिढ्या उलटल्या आहेत. खरं तर एवढ्या काळात एखादा लेखक आणि त्याचे साहित्य केव्हाच विस्मरणात विरून नामशेष व्हायचे. पण गडक-यांचे साहित्य ह्या न्यायाला पुरून उरले. त्यांचे लेखन अगदी काल-परवाच झाले असावे असे वाटण्या इतपत ते ताजे आणि आजच्या बदलत्या संदर्भातही सुसुंगत वाटते.

राम गणेश गडकरी या नावाचा उल्लेख ‘मराठी शेक्सपिअर’असा केला जातो. आम्ही एक वेळ इंग्लंड देऊ, पण शेक्सपिअर देणार नाही हा इंग्रजी बाणा सर्वांना परिचित आहे. त्यानुसार शेक्सपिअरचे समग्र साहित्य आज इंटरनेटवर मोफत उपलब्ध आहे. जगभरातल्या वाचकांना आणि अभ्यासकांची फार मोठी सोय त्यामुळे झाली आहे. राम गणेश गडकरींचे समग्र साहित्य तर सोडाच, पण त्यांचे एखादे नाटकही आज इंटरनेटवर सापडत नाही. ती उणीव भरून काढण्यासाठी http://www.ramganeshgadkari.com हे संकेतस्थळ संगणक प्रकाशनने निर्माण केले आहे. त्यावर गडक-यांचे समग्र साहित्य मोफत उपलब्ध असणार आहे.